आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Kolhapur Mayor Arrested Acb Today In Case Of Bribe

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोल्हापूर: महापौर माळवींना अटक, 50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- कोल्हापूरच्या महापालिकेच्या लाचखोर महापौर तृप्ती माळवींना अखेर पाच दिवसानंतर अॅटीकरप्शन विभाग (एसीबी)ने आज सकाळी अटक केली. रूग्णालयातून डिस्चार्ज मिळताच एसीबीने तत्काळ कारवाई करीत माळवींना अटक केली. त्यानंतर दुपारी माळवींना कोल्हापूर सेशन कोर्टात हजर केले. कोर्टाने माळवींना 50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. शुक्रवारी सायंकाळी तृप्ती माळवींच्या सहाय्यकाला 16 हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले होते.
महापौर तृप्ती माळवी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने कालच (बुधवारी) फेटाळला होता. तब्बेत बरी नसल्याचे कारण पुढे करून माळवी यांनी अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला होता. मात्र, कोर्टाने अर्ज फेटाळला. त्यामुळे तृप्ती माळवी यांनी आज सकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला. त्यानंतर माळवी यांना डिस्जार्ज मिळता क्षणीच अटक करण्यात आली. त्यामुळे अटक टाळण्यासाठी माळवी यांनी केलेली सारी धडपड निष्फळ ठरली आहे.
महापौर तृप्ती माळवी यांना 30 जानेवारीला 16 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी रंगेहाथ पकडले होते. कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील संतोष पाटील यांच्या घरासमोरची जमीन महापालिकेने ताब्यात घेतली होती. ती जमीन परत मिळवण्यासाठी पाटील यांच्याकडे महापौर तृप्ती माळवी यांनी 40 हजार रुपयांची लाच मागितली होती. विशेष म्हणजे पीए अश्विन गडकरी यांच्यामार्फत संतोष पाटील यांच्याकडून 40 हजारांवरून 16 हजार रुपयांत सेटलमेंट करण्यात आली होती.
पुढे वाचा, तृप्ती माळवींनी दिला राजीनामा...