Home | Maharashtra | Western Maharashtra | Kolhapur | Kolhapur Municipal Corporation by poll result 2017

कोल्हापूर महापालिका पोटनिवडणूक: रत्नेश शिरोळकरचा विजय, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षाचा पराभव

प्रतिनिधी | Update - Oct 12, 2017, 02:58 PM IST

कोल्हापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 11 च्या पोटनिवडणूकीत भाजपा-ताराराणी आघाडीचे रत्नेश शिरोळकर राष्ट्रवादी कॉग्रसचे श

  • Kolhapur Municipal Corporation by poll result 2017
    कोल्हापूर- महानगरपालिका प्रभाग क्रमांक 11 च्या पोटनिवडणूकीत भाजपा-ताराराणी आघाडीचे रत्नेश शिरोळकर राष्ट्रवादी कॉग्रसचे शहर अध्यक्ष राजेश लाटकर यांचा 200 मतांनी पराभव करून विजयी झाले.

    शिरोळकर यांना 1399 तर लाटकर यांना 1199 मते मिळाली. शिवसेनेचे उमेदवार राज जाधव यांना अवघी 80 मते पडली. माजी नगरसेवक निलेश देसाई यांचा जातीचा दाखला विभागीय जात पडताळणी समितीने अवैध ठरवल्यामुळे प्रभाग क्रमांक 11 ताराबाई पार्क येथे पोटनिवडणूक जाहीर झाली होती. राज बाबूभाई जाधव (शिवसेना), रत्नेश जिन्नाप्पा शिरोळकर (ताराराणी आघाडी), पवन पांडुरंग माळी व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेश भरत लाटकर (दोघेही अपक्ष) यांच्यात लढत रंगली होती.
    बुधवारी 4898 पैकी 2824 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. व्यावसायिक, नोकरदार, उच्चशिक्षित मतदार असलेल्या या मतदार संघातील सुमारे 270 मतदारानी अन्यत्र स्थलांतर केल्याने पोट निवडणुकीत मतदान कमी झाले होते.

Trending