आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kolhapur Municipal Corporation Election 2015 Result Live

KOLHAPUR RESULT: सतेज पाटलांनी \'गड\' राखला! काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- कोल्हापूरात काँग्रेस आणि भाजप- ताराराणी युतीत जोरदार रस्सीखेच झाली मात्र अखेर सतेज पाटील यांनी आपला गड राखण्यात यश मिळवले. काँग्रेस पक्षाने सर्वाधिक 27 जागा जिंकल्या आहेत. त्यापाठोपाठ महाडिक कुटुंबियांच्या ताराराणी संघटनेने 20 जागा मिळवल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने 15 जागा जिंकल्या आहेत. भाजपचे 12 जागावर उमेदवार विजयी झाले. शिवसेनेला केवळ 4 जागा मिळाल्या.
दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाचा सत्तेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. काँग्रेस (27) आणि राष्ट्रवादी (15) या दोन्ही पक्षांना 42 जागा मिळाल्या आहेत. कोल्हापूरात बहुमतासाठी 41 नगरसेवकांची गरज आहे. अपक्ष 3 जण निवडून आले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आघाडी करण्यास तयार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
कोल्हापूर महापालिका सभागृहात 2010 च्या निवडणुकीत काँग्रेसचे 33, राष्ट्रवादीचे 25, जनसुराज्य आघाडीचे 10, तर शिवसेना-भाजप आघाडीचे 9 नगरसेवक होते.
1.25 PM: 81 पैकी 27 जागांवर काँग्रेस आघाडीवर, ताराराणी 20, भाजप 12 जागांवर आघाडीवर, राष्ट्रवादी 15 जागांवर आघाडीवर, शिवसेना 4 जागांवर आघाडीवर
1.00 PM: 73 पैकी 25 जागांवर काँग्रेस आघाडीवर, ताराराणी 17, भाजप 10 जागांवर आघाडीवर, राष्ट्रवादी 15 जागांवर आघाडीवर, शिवसेना 3 जागांवर आघाडीवर
12.40 PM: 65 जागांपैकी 26 जागांवर ताराराणी-भाजप आघाडीवर, काँग्रेस 24 जागांवर पुढे...काँग्रेस आणि ताराराणी-भाजपात जोरदार रस्सीखेच...
12.20 PM: 56 जागांपैकी 23 जागांवर काँग्रेसने मुसंडी मारली आहे. ताराराणी -भाजप 19 जागांवर आघाडीवर आहे. राष्ट्रवादी 9 जागांवर आघाडीवर आहे तर शिवसेना केवळ 3 जागांवर आघाडीवर आहे.
11.30 AM: 34 पैकी 18 जागांवर भाजप-ताराराणीचे उमेदवार आघाडीवर, राष्ट्रवादी 10 जागांवर, काँग्रेस 3 जागांवर तर, शिवसेना 1 जागेवर आघाडीवर आहे.
11.27 AM: राष्ट्रवादीचे बडे नेते राजेश लाटकर पराभूत, ताराराणीचे नेते आशिष ढवळेंकडून लाटकर पराभूत
0.59 AM: राष्ट्रवादीचे मुरलीधर जाधव विजयी
पुढील स्लाईडवर वाचा,
सतेज पाटील यांनी गड राखला....
हसन मुश्रीफ यांचे परिश्रम फळाला....
चंद्रकांत पाटील यांचे प्रभावी बेरजेचे राजकारण
...