कोल्हापूर- कोल्हापूर महापालिकेच्या लाचखोर महापौर तृप्ती माळवी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने बुधवारी फेटाळला. तब्बेत बरी नसल्याचे कारण पुढे करून माळवी यांनी अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला होता. मात्र, कोर्टाने अर्ज फेटाळला. तृप्ती माळवी अद्याप रुग्णालयात उपचार घेत आहेत.
दुसरीकडे, तृप्ती माळवी यांना डिस्जार्ज मिळेल त्या क्षणी अटक केली जाईल, असे पोलिसांनी म्हटले आहे. त्यामुळे अटक टाळण्यासाठी माळवी यांची सुरु असलेली धडपड निष्फळ ठरणार आहे.
दरम्यान, महापौर तृप्ती माळवी यांना 30 जानेवारीला 16 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी रंगेहाथ पकडले होते. कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील संतोष पाटील यांच्या घरासमोरची जमीन महापालिकेने ताब्यात घेतली होती. ती जमीन परत मिळवण्यासाठी पाटील यांच्याकडे महापौर तृप्ती माळवी यांनी 40 हजार रुपयांची लाच मागितली होती. विशेष म्हणजे पीए अश्विन गडकरी यांच्यामार्फत संतोष पाटील यांच्याकडून 40 हजारांवरून 16 हजार रुपयांत सेटलमेंट करण्यात आली होती.
पुढील स्लाइडवर वाचा, अजित पवार म्हणाले, लाचखोर तृप्ती माळवी यांची गय केली जाणार नाही!