आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर: थेट पाईपलाईनमधील त्रुटीबाबत समाधानकारक उत्तर न दिल्याने अधिकाऱ्याला कोंडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर:  महानगरपालिकेच्या काळम्मावाडीमध्ये थेट पाईपलाईन योजनेतील त्रुटीबाबत माहिती देण्यासाठी बचाव जनसमूह आणि सर्वपक्षीय कृती समिती आणि मनपा अधिकाऱ्यांची मंगळवारी बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने चिडलेल्या थेट पाईपलाईन योजना सर्वपक्षीय कृति समितीच्या सदस्यांनी संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यालयातील साहित्याची नासधूस करून अधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त केला. त्यानंतर राजेंद्र हासले या अधिकाऱ्याला पुईखडी येथील युनिटी कन्सल्टंटच्या कार्यालयात कोंडून कार्यालयाला बाहेरून कुलूप ठोकले. 

पुईखडी येथील युनिटी कन्सल्टंटच्या कार्यालयात मंगळवारी सकाळी बचाव जनसमूह आणि सर्वपक्षीय कृती समितीचे कार्यकर्ते थेट पाईपलाईन संदर्भातील त्रुटींबाबत जाब विचारण्यासाठी गेले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी या योजनेच्या अंदाजपत्रकात काही ठिकाणी खर्चाचे आकडे कसे फुगविण्यात आल्याचे सांगून जाब विचारण्यास सुरुवात केली. बैठकीत समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी खुर्च्या इतस्त: फेकल्या आणि निषेध केला. या आंदोलनात कृति समितीतर्फे आर. के. पोवार, सतिश कांबळे, अमित सासने, घाडगे, नामदेव, बाबा पार्टे, जयकुमार शिंदे, महादेव पाटील, अमित चव्हाण, आदींनी भाग घेतला. कार्यकर्ते अधिकाऱ्यांना कोंडून घालण्याच्या तयारीत आहेत हे लक्षात आल्यानंतर अन्य अधिकाऱ्यानी तेथून पळ काढला. मात्र अधिकारी राजेंद्र हासले हे कार्यकर्त्यांच्या तावडीत सापडले. कार्यकर्त्यांनी त्यांना कोंडून घालून कार्यालयाला कुलूप लावले. 
बातम्या आणखी आहेत...