आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kolhapur News In Marathi, Divya Marathi, Chinese

कोल्हापुरात बॉम्बचा स्फोट, दोन जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - कोल्हापुरातील शाहू टोल नाक्याजवळील एका चायनीजच्या गाडीवर गावठी बॉम्बचा स्फोट होऊन दोघेजण जखमी झाले असून रात्री उशिरा पुणे एटीसचे पथक पुण्याहून कोल्हापूरकडे निघाले आहे. रात्री आठच्या सुमारास चायनीज गाडीवर सोडून देण्यात आलेल्या एका पिशवीमध्ये हा बॉम्ब ठेवण्यात आला होता. स्फोट झाल्यानंतर जखमींना इस्पितळात दाखल करण्यात आले. घटनेनंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी धावले. बॉम्बमध्ये छर्रे, बॉल बेअरिंगचा वापर झाला होता. गणेशाेत्सवाच्या तोंडावरच झालेल्या या स्फोटामुळे पोलिसांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. एटीएस या प्रकरणाचा तपास करणार आहे.