आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांनी केली कोल्‍हापूरच्‍या चार तरुणांना बेदम मारहाण; दोघे गंभीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर – शहरातील एका पेट्रोल पंपावर झालेल्‍या चोरीच्‍या घटनेत ताब्‍यात घेतलेल्‍या चार संशयित युवकांना पोलिसांनी बेदम मारहाण केल्‍याची घटना आज (शनिवार) उघडकीस आली. यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
शहरालगत असलेल्‍या एका पेट्रोलपंपावर 8 जुलै रोजी ट्रकमधून चोरी झाली. ट्रक मालकाने चोरीची तक्रार दाखल केली. पोलिसांनी चौकशीसाठी पेट्रोलपंपावरच काम करणाऱ्या चार तरुणांना ताब्‍यात घेतले. या गुन्ह्याची कबुली देण्यासाठी आरोपींच्या गुप्तांगामध्ये केमिकलची इंजेक्शन दिल्याचाही ठपका पोलिसांवर ठेवण्यात आला आहे. न केलेली चोरी पोलिस बळजबरीने वदवून घेत असल्याचा दावा पीडित तरूणांनी केला आहे. दरम्यान, या प्रकरणी पीडित तरुणांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.