आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाभाेलकर हत्याकांड : मारेकऱ्यांना जतमध्ये गोळीबाराचे प्रशिक्षण?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी अटकेत असलेला संशयित डॉ. वीरेंद्र तावडे याने दिलेल्या माहितीच्या आधारे सीबीआयचे पथक जत तालुक्यातील काराजनगी या रुद्र पाटील याच्या गावी पुन्हा चौकशी करून गेले. मारेकऱ्यांना गोळीबाराचे प्रात्यक्षिक काराजनगी येथे देण्यात आल्याचा त्यांना संशय आहे.

गाेव्यातील मडगाव बॉम्बस्फोटात ठार झालेला सनातन संस्थेचा साधक मलगोंडा पाटील व फरारी असलेला रुद्र पाटील यांचे काराजनगी हे गाव. २००९ ला मडगावात स्फोट झाला. त्याचे प्रात्यक्षिक काराजनगीत करण्यात आल्याचे उघड झाले होते. दिवाळीत हे प्रात्यक्षिक केल्याने त्यावेळी कोणाला आवाजाचा संशय आला नव्हता. पण ‘एनआयए’च्या तपासात ही माहिती उघड झाली होती. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी समीर गायकवाड याला अटक केल्यानंतर मलगोंडा व रुद्र पुन्हा चर्चेत आला. त्याच्या शोधासाठी गेल्या वर्षी कर्नाटक पोलिसांचे पथक काराजनगी येथे येऊन गेले होते. आता डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणाची मुळे सनातन संस्थेपर्यंत येऊन पोहोचल्यानंतर रुद्र पाटील याचा सीबीआयने शोध सुरू केला आहे. कॉम्रेड पानसरे आणि डॉ. दाभोलकर यांच्या हत्येसाठी मारेकऱ्यांना काराजनगी येथेच पिस्तूल चालवण्याचे प्रशिक्षण दिल्याचा सीबीआयला संशय आहे. त्यासाठी सीबीआयचे पथक काराजनगी येथे नुकतेच येऊन माहिती घेऊन गेले.

तावडेला शुक्रवारी काेल्हापुरात अाणणार
दाभाेलकर हत्या प्रकरणात सहभागाच्या संशयावरून अटक करण्यात अालेल्या वीरेंद्र तावडेचा ताबा काेल्हापूर पाेलिसांकडे देण्यास पुणे न्यायालयाने मंजुरी दिली अाहे. त्यानुसार शुक्रवारी तावडेला काेल्हापुरात अाणले जाईल. काॅ. गाेविंद पानसरेच्या हत्येप्रकरणीही त्याच्याकडे चाैकशी केली जाणार अाहे. या प्रकरणातील अटकेत असलेला संशयित समीर गायकवाड व तावडेची समाेरासमाेर चाैकशी केली जाण्याचीही शक्यता अाहे.
बातम्या आणखी आहेत...