आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तो होता क्रीडा शिक्षक विद्यार्थिनींसोबत करु लागला वेगळेच काही; कोल्हापूरातील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- कोल्हापूर पब्लिक स्कूलमध्ये 4 विद्यार्थीनींचे लैंगिक शोषण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात क्रीडा शिक्षकावर लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला आहे.
 
हॉकी प्रशिक्षणासाठी आलेल्या मुलींचे लैंगिक शोषण
हॉकी प्रशिक्षणासाठी आलेल्या मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप या शिक्षकावर करण्यात आला आहे. या प्रकरणात शिक्षक विजय मनुगडे याच्यावर राजरामपुरी पोलिसात बलात्कार आणि लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापुरातील राजेंद्रनगर परिसरात कोल्हापूर पब्लिक स्कुल आहे. या शाळेतील हॉकी प्रशिक्षक विजय मनुगडे याने मे महिन्या पासून हॉकी प्रशिक्षण देण्याच्या बहाण्याने 4 अल्पवयीन मुलींचे लैगिंक शोषण सुरू केलं त्यातील एका विद्यार्थिनीवर बलात्कारही केला. हॉकी खेळासाठी लागणारे कपडे घेण्याच्या बहाण्याने या  नराधमाने पीडित  मुलीवर आपल्या राहत्या घरी नेऊन आणि शाळेच्या परिसरात बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर मुलींच्या पालकांनी केला आहे.   मुलींनी आपल्या पालकांच्याकडे या प्रकाराबद्दल तक्रार केल्यावर पालकांनी थेट राजारामपुरी पोलीस ठाण्यात जाऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हा नोंद झाल्यावर संशयित आरोपी विजय मनुगडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक संजय साळोखे करत आहेत. संशयित मनुगडे याच्या घरासमोर आणि कोल्हापूर पब्लिक स्कुल येथे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.                        
 
बातम्या आणखी आहेत...