आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूरच्या राधानगरीच्या जंगलात काजवा महोत्सव सुरु

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील काळम्मावाडीच्या घनदाट जंगलात शुक्रवारच्या रात्री राज्यातून आलेल्या हौशी पर्यटकांनी झाडांवर चमकणाऱ्या काजव्यांच्या चमचमणाऱ्या प्रकाशात प्रकाशोत्सव अनुभवला. राधानगरी येथील बायसन नेचर क्लब या संस्थेमार्फत २६ मे पासून हा काजवा प्रकाशोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
 
अंधाऱ्या रात्री चमकणारे काजवे प्रत्यक्ष पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली होती. हा काजवा महोत्सव पावसाळा सुरू होईपर्यंत रोज चालणार आहे. या महोत्सवाचे उदघाटन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, अजितदादा पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार आदी मान्यवर उपस्थित होते. 

सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत चमचमणारे काजवे पाहण्यासाठी तसेच पदभ्रमंती, आणि चांदण्या रात्री सहकुटूंब स्नेहभोजन, करमणुकीच्या कार्यक्रमाचे या काजवा महोत्सवात करण्यात आले आहे. जैव विविधेतमध्ये महत्वाच्या आणि दुर्मिळ होत चाललेल्या काजव्यांचे दर्शन ही अनोखी अनुभूती शुक्रवारी रात्री पर्यटकांनी अनुभवली. मे महिन्याच्या अखेरच्या आठवडयापासून पहिल्या पावसाचे आगमन होईपर्यंत राधानगरी, दाजीपूर, काळम्मावाडी या जंगल परिसरातील असंख्य झाडांवर हे काजवे चमकताना दिसतात. याच काळात काजवे नैसर्गिकरित्या आपल्या प्रकाशाने जोडीदाराला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतात. निसर्गातील अत्यंत अद्भूत असे हे काजवे राधानगरीसारख्या परिसरातील घनदाट जंगलात पावसाळ्यापूर्वी चमकताना आढळतात. दाजीपूर, राधानगरी, काळम्मावाडी जंगल परिसरातील हिरडा, बेहडा, अंजनी, जांभूळ, आंबा, उंबर, करंज या निवडक झाडांवर हा काजव्यांचे थवेच्या थवे दिसतात.
बातम्या आणखी आहेत...