आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्री महालक्ष्मी मूर्तीवर अाजपासून संवर्धन प्रक्रिया, धार्मिक विधींना प्रारंभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- श्री महालक्ष्मीच्या मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया बुधवारपासून करण्यात येणार आहे. केंद्रीय पुरातत्त्व खात्याचे तज्ज्ञ ही प्रक्रिया करणार असून श्रीपूजकांनी मंगळवारपासूनच धार्मिक विधींना प्रारंभ केला आहे. त्यामुळे २२ जुलै ते ६ आॅगस्ट या कालावधीत महालक्ष्मीच्या मूळ मूर्तीचे दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे.

बुधवारी श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या हस्ते महापूजा होईल व त्यानंतर ही प्रक्रिया सुरू होईल. या अनुषंगाने सर्व धार्मिक विधी श्रीपूजक करणार असून यामध्ये कलाकर्षण विधी, कुष्मांड होम, श्रीकर नारायण विधान, देवा भागवत नवाह पारायण, श्रीमंत्र होम, सहस्रचंडी अनुष्ठान, श्री सुक्त लक्ष जप, करवीर माहात्म्य सप्ताह पारायण, श्री गुरुचरित्र सप्ताह पारायण, श्री सूक्त विधान, चतुषष्ठी योगिनी विधान, श्रीरंक भैरव विधान यासारखे एकूण २५ विधी ६ आॅगस्टपर्यंत चालणार आहेत. प्राणप्रतिष्ठा विधीवेळी करवीर पीठाचे शंकराचार्य श्री विद्यानृसिंह भारती स्वामी, मध्वाचार्य पीठाचे श्रीसत्यात्मतीर्थ स्वामी उपस्थित राहणार आहेत. याव्यतिरिक्त या कालावधीत गरुड मंडपामध्ये श्रीपूजक मंडळ, शाहू वैदिक स्कूल, कोल्हापूर जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघ, करवीर निवासिनी पुरोहित मंडळ, दक्षिण काशी पुरोहित मंडळ यांच्या वतीने जप, पठण, ग्रंथ पारायणे होणार आहेत. सुहास जोशी, अजित ठाणेकर यांनी ही माहिती दिली.
बातम्या आणखी आहेत...