आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महालक्ष्‍मीचा व्रजलेप अधार्मिक; काम थांबवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- श्री महालक्ष्मीच्या मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रियेला केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्‍या तज्ज्ञाकडून काल (बुधवार) पासून सुरुवात करण्यात आली. मात्र, हा विधी पूर्णत: धार्मिक असल्‍याचे मत व्‍यक्‍त करत हिंदू जनजागरण समितीने आज (गुरुवार) दुपारी 1 वाजताच्‍या सुमारास याला विरोध केला. त्‍यामुळे व्रजलेपाचे काम थांबवले गेले. या कामामुळे २२ जुलै ते ६ ऑगस्ट या कालावधीत महालक्ष्मीच्या मूळ मूर्तीचे दर्शन बंद ठेवण्यात आलेले आहे. बुधवारी श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या हस्ते महापूजा झाल्‍यानंतर ही प्रक्रिया सुरू झाली होती.