आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर-शिर्डी थेट रेल्वे लवकरच, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचे खासदार महाडिकांना आश्वासन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर रेल्वे स्थानक. - Divya Marathi
कोल्हापूर रेल्वे स्थानक.
कोल्हापूर- खासदार धनंजय महाडिक यांनी दिल्ली येथे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन कोल्हापूर-शिर्डी (साईनगर) अशी थेट रेल्वे सुरू करण्याची मागणी केली आहे. कोल्हापूर-शिर्डी थेट रेल्वे लवकरच सुरू करण्याचे आश्वासन प्रभू यांनी त्यांना दिले आहे.
 
कोल्हापूरहून सुटणाऱ्या रेल्वे-गाड्यांची संख्या तुलनेने कमी आहे. रेल्वेस्थानकाचे सुशोभिकरण, तिथली प्रलंबित विकासकामे, पायाभूत सुविधा मिळण्याबाबत तसेच देशातील महत्त्वाच्या शहरांना रेल्वेने जोडण्यासाठी नवीन रेल्वेची मंजुरी मिळावी, यासाठी खासदार धनंजय महाडिक यांचे नियोजनबद्ध प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महाडिक यांनी दिल्ली येथे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेतली.
 
कोल्हापूर-शिर्डी (साईनगर) अशी थेट रेल्वे सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. आठवड्यातून एकदा ही गाडी सोडण्याचे नियोजन व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यासाठी रेल्वेची उपलब्धता असल्याचेही त्यांनी प्रभू यांच्या निदर्शनास आणून दिले.
 
कोल्हापूर ते नागपूर एक्स्प्रेस आठवड्यातून एकदा निघते आणि कोल्हापुरात पोहोचल्यानंतर मेंटेनन्सनंतर ती गाडी तब्बल 32 तास मिरज स्टेशनच्या रॅकमध्ये उभी असते. या कालावधीमध्ये या रेल्वे-गाडीचा वापर करून कोल्हापूर-शिर्डी अशी थेट रेल्वे सुरू करता येईल, असेही खासदार महाडिक यांनी सांगितले.

केंद्रीय रेल्वे मंत्री प्रभू यांनी या प्रस्तावित गाडीच्या वेळांबाबत माहितीची विचारणा केली असता खासदार महाडिक म्हणाले, बुधवारी सायंकाळी चार वाजता ही गाडी कोल्हापुरातून निघाल्यास गुरुवारी पहाटे 5 वाजून 50 मिनिटांनी शिर्डीला पोहोचेल. तसेच गुरुवारी सकाळी शिर्डीतून माघारी कोल्हापूरला निघाल्यास गुरुवारी रात्री उशिरा 12 ते 12.30 दरम्यान पोहोचेल. तसेच नागपूरच्या फेरीसाठी ही गाडी पुन्हा सज्ज राहू शकते.
बातम्या आणखी आहेत...