आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kolhapur Student Agitation Against Professor Strike

कोल्हापुरात कुलगुरू, प्राध्यापकांना कोंडले; संपामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांचे आंदोलन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर - ‘मागण्यांबाबत शासन सकारात्मक असताना तुम्ही विद्यार्थ्यांना वेठीस का धरता?’ असा सवाल करत विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन.जे.पवार, अन्य वरिष्ठ अधिकारी आणि प्राध्यापकांना कोंडले. त्यांनी कुलगुरूंच्या दालनाबाहेरील मुख्य गेटलाच कुलूप घातल्याने अखेर पोलिसांना मध्यस्थी करावी लागली.
प्राध्यापकांच्या संपाविरोधात विद्यार्थी संघटनांचे कोल्हापुरात आंदोलन सुरू आहे. बुधवारी सायंकाळी साडेपाचनंतर विद्यार्थी व कार्यकर्ते कुलगुरूंना निवेदन देण्यासाठी गेले होते. या वेळी चर्चेसाठी विद्यापीठाचे प्रशासकीय अधिकारी तसेच प्राध्यापकांच्या ‘सुटा’ संघटनेचे प्रतिनिधीही उपस्थित होते.
सुमारे तासभर चर्चा झाली. या वेळी विद्यार्थी संघटनांनी प्राध्यापकांना धारेवर धरले. ‘तुमच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असताना तुम्ही मात्र संप ताणत आहात. विद्यार्थ्यांना वेठीस धरत आहात,’ असे विद्यार्थी म्हणाले. त्यामुळे शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे ‘जोपर्यंत संप मागे घेत नाही तोपर्यंत तुम्हाला बाहेर सोडत नाही,’ असे म्हणत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बाहेरच्या गेटलाच आतून कुलूप घातले. अखेर पोलिस निरीक्षक मा. शा. पाटील यांनी विद्यार्थी व कार्यकर्त्यांची समजूत काढली.