आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापुरातून सोमवारी पुन्हा निघणार टोलविरोधात महामोर्चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - सर्वोच्च न्यायालयानेही टोल वसुलीला स्थगिती देण्यास नकार दिल्याने आता टोल वसुलीसाठी एकीकडे आयआरबी कंपनीने जय्यत तयारी सुरू केली आहे, तर दुसरीकडे सोमवारी टोलविरोधी कृती समितीने महामोर्चाचे आयोजन केले आहे.

याआधीही दोन वेळा आयआरबीने टोल वसुलीचा प्रयत्न केला असता टोल नाके जाळण्यात आले. त्यानंतर न्यायालयीन लढाईत आयआरबीने बाजी मारली असून त्यांना टोल वसुलीसाठी मुभा देण्यात आली आहे. पोलिस बंदोबस्त देण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. तेव्हा पोलिसांसाठी प्रत्येक टोलनाक्यावर मूलभूत सुविधा असतील तरच बंदोबस्त देण्यात येणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले होते. त्यामुळे नाक्यांवर आयआरबीने पोलिसांसाठी शेड, पाण्याची व्यवस्था केली आहे. तसेच संगणकीय व्यवस्थाही सज्ज करण्याचे काम सुरू आहे.

आयआरबीचे कार्यकारी संचालक वीरेंद्र म्हैसकर हेच वसुली कधी करायची याबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, राज्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या टोलबाबतच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पंचगंगेत बुडवू अशी घोषणा केली होती. कोल्हापूरच्या जनतेवर टोल बसवू देणार नाही; अन्यथा मंत्रिपदाचे राजीनामे देऊ, असेही त्यांनी जाहीर केले होते. त्यामुळे आता पुन्हा टोल वसुली सुरू झाली तर या दोघांची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.