आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kolhapur Toll Tax Recovery Issue Toll Both Fire To Shiv Sena

कोल्हापुरात टोलवसुली विरोधात भडका; शिवसेनेने टोल नाके पेटवले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- कोल्हापुरात शहरांतर्गत टोलवसुली विरोधात भडका उडाला असून शिवसैनिकांनी शहरातील तीन टोल नाके मध्यरात्री जाळले. यात बावडा टोल नाका, शाहू टोल नाका आणि फुलेवाडी टोल नाक्याचा समावेश आहे.

शहरांतर्गत असलेल्या टोलनाक्यांवर जाता- येता कोल्हापूरकरांना टोल भरावा लागणार आहे. त्यामुळे या टोल वसुलीला नागरिकांचा विरोध आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवण्यात आले होते. परंतु त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. अखेर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना शहरांतर्गत असलेल्या टोलनाक्यांवर हल्लाबोल केला.