आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kolhapur Zilha Parishad News In Marathi, Umesh Apte, Divya Marathi

कोल्हापूर जि. प.चा अनाथ मुलांना आर्थिक आधाराचा हात देणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या अनाथ मुलांना आर्थिक आधार देण्याचा स्तुत्य निर्णय कोल्हापूर जिल्हा परिषदेने घेतला आहे. या उपक्रमासाठी 20 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. उमेश आपटे यांनी जिल्हा परिषदेची सूत्रे हाती घेतल्यानंतर हा पहिलाच उपक्रम आहे.

गेले अनेक दिवस आपटे यांच्या मनामध्ये जिल्ह्यातील अनाथ मुलांसाठी योजना आखण्याचे घाटत होते. परंतु तशी संधी त्यांना मिळाली नव्हती. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारण बदलले आणि त्यांना अध्यक्षपदाची संधी मिळाल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील अनाथ मुलांची आकडेवारी संकलित करण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले. त्यानुसार जिल्ह्यात 385 विद्यार्थी अनाथ असल्याचे आढळून आले.

शाळा-शाळांमधून या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळत असते. ज्यांचा सांभाळ चांगल्या घरात होत असतो त्यांना अनेक वस्तू मिळतात. परंतु बहुतांशी विद्यार्थी हे गरीब घरातील असल्याने त्यांना गणवेश, स्वेटर, सायकल, चप्पल यासह अनेक वस्तूंची वानवा असते.

हीच गरज ओळखून या विद्यार्थ्यांना मदत करण्याची ही संकल्पना आपटे यांनी मांडली आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ही कल्पना लगेच उचलून धरली. त्यामुळे आता यंदाच्या आर्थिक वर्षासाठी 20 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या या उपक्रमामुळे जिल्हाभरातील अनाथ मुलांना मोठा हातभार मिळणार आहे.

मायेचा हात देण्याचा प्रयत्न
याबाबत आपटे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले दुर्दैवाने जिल्हाभर फिरताना अनेक ठिकाणी अशी अनाथ मुले भेटतात. ज्यांना आई-वडिलांचे छत्र नाही त्यांचे दु:ख त्यांनाच माहीत; मात्र मी एकटा किंवा एकटी नाही माझ्यासमवेत समाज आहे, शासन आहे. मायेचा हात देणारं कुणीतरी आहे, असं या विद्यार्थ्यांना वाटावं आणि त्यांना त्यांच्या आयुष्यासाठी प्रेरणा मिळावी यासाठी ही योजना आखली आहे.