आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोल्हापूरकरांनी दहीहंडी रद्द करून शहिदाच्या वारसांना दिली 1 लाख रूपये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर - गेली पाच वर्षे औरंगाबाद येथील निरालाबाजार परिसरात होणारी दहीहंडी यंदा रद्द एक लाख रुपयांचा निधी शहीद कुंडलिक माने यांच्या परिवाराला देण्याचा विधायक उपक्रम मनसेप्रणित राजयोग प्रतिष्ठानने राबवला आहे. शुक्रवारी पदाधिका-यांनी पिंपळगाव (ता. कागल) येथे जाऊन माने परिवाराकडे ही मदत सुपूर्द केली.
सामाजिक जबाबदारी भान ठेवून राजयोग प्रतिष्ठानने या परिवाराला मदत देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मनसेचे नगरसेवक राजगौरव वानखेडे, संजोग बडवे, अनिल लहाने, विशाल आहेर, चंदन कुलकर्णी, अमोल खडसे, सचिन जिरे, ललित सरदेशपांडे, विजय जाधव, अंबादास आडसूळ हे सर्व पदाधिकारी शुक्रवारी कोल्हापूर मार्गे पिंपळगावला पोहोचले. माने यांच्या परिवाराचे सांत्वन करून कार्यकर्त्यांनी कुंडलिक यांच्या वडिलांकडे मदतीची रक्कम सुपूर्द केली. पिंपळगावच्या ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक केले.