आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kolhaur Belgaon Police Againsts Priveate Sawvkar

काेल्हापूर, बेळगावचे सावकार रडारवर, विम्यासाठी मृत्यूच्या बनावाचे प्रकरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - पस्तीसकोटी रुपयांचा विमा मिळवण्यासाठी मरणाचे नाटक करणाऱ्या अमोल पवारच्या कारनाम्यामुळे कोल्हापुरातील १४ सावकारांभोवती कारवाईचा फास आवळण्यात कोल्हापूर पोलिसांना यश आले आहे. यात कोल्हापूरप्रमाणेच बेळगावच्या काही सावकारांना दणका बसल्याने त्याचे हादरे राजकीय वर्तुळातही बसण्याची शक्यता आहे.
बांधकाम कंत्राटदार अमोल पवार याने सावकारांची देणी फेडण्यासाठी मरणाचा बनाव केला होता. आपण मेल्याचे दाखवून विम्याचे ३५ कोटी मिळवून देणी भागवण्याचे त्याचे नियोजन होते. त्यासाठी त्याने कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथील एका युवकाचा गळा दाबून खून केला गाडी पुलावरून ढकलून आपल्याच मरणाचा बनाव केला. मात्र, कोल्हापूर विशेष गुन्हा शाखा आणि आजरा पोलिस यांनी प्रकरणाच्या मुळाशी जात अमोल याला केरळमधून अटक केली. यानंतर त्याला भरमसाट व्याजाने पैसे देणाऱ्या सावकारांच्या विरोधातच आता पोलिसांनी फास आवळला आहे. या सावकारांच्या घरांवर एकाच दिवशी गुरुवारी छापे टाकून कागदपत्रे तपासणीचे काम सुरू करण्यात आले आहे. पैसे देण्याचे आमिष दाखवून गरीब तरुणाच्या खून केल्याप्रकरणी अटकेत असलेला बांधकाम व्यावसायिक अमोल पवारला कोट्यवधीचे कर्ज देऊन त्याच्या बदल्यात त्याची मनमानी वसुली करणारे कोल्हापुरातील १४ सावकार कायदेशीर कारवाईच्या फासात अडकले आहेत. जुना राजवाडा पोलिसांत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. या सावकारांच्या घरांवर पोलिसांनी विशेष पथकांद्वारे इनकॅमेरा छापे घातले आणि कर्जापोटी तारण घेतलेल्या मालमत्तेच्या कागदपत्रांची तपासणी केली. दिवसभर ही मोहीम राबवण्यात आली. सावकारांवर छापा टाकण्यासाठी नेमलेल्या पथकात दोन सहायक पोलिस निरीक्षक, ११ पोलिस उपनिरीक्षकांसह ५२ पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. प्रत्येक पथकात एक अधिकारी, चार पोलिसांचा समावेश हाेता.