Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | konkan railway traffic disturbed due to heavy rains

मोसमी पावसाचा कोकण रेल्‍वेला पहिला दणका, वाहतूक खोळंबली

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Jun 18, 2012, 09:14 AM IST

लांजा आणि आडवली रेल्‍वे स्‍थानकादरम्‍यान रुळांवर मातीचे ढिगारे आले होते. ते हटविण्‍यात आले आहेत.

  • konkan railway traffic disturbed due to heavy rains

    रत्‍नागिरीः राज्‍यात मोसमी पावसाचे आगमन होताच कोकण रेल्‍वेला फटका बसला आहे. कोकणात सुरु असलेल्‍या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्‍वेला ब्रेक लागला असून अतिशय संथ गतीने वाहतूक सुरु आहे. लांजा आणि आडवली रेल्‍वे स्‍थानकादरम्‍यान रुळांवर मातीचे ढिगारे वाहून आले होते. त्‍यामुळे अनेक गाड्या थांबविण्‍यात आल्‍या होत्‍या. माती हटविण्‍यात आल्‍यानंतर संथ गतीने वाहतूक सुरु झाली आहे. दोन्‍ही दिशेने धावणा-या गाड्या सुमारे 4 तास उशीराने धावत आहेत. रेल्वे मार्गावर आलेली माती सातवाजेपर्यंत दूर करण्यात प्रशासनाला यश आले.
    एर्नाकुलम -पुणे एक्सप्रेस रत्नागिरीत थांबविण्‍यात आली होती. तर गरीब रथ एक्‍स्‍प्रेस सावर्डे स्टेशनवर, मंगलोर एक्स्‍प्रेस खेड स्टेशनवर, राज्य राणी एक्सप्रेस वीर स्टेशनवर आणि कोकणकन्या एक्सप्रेस माणगाव स्टेशनवर थांबवण्यात आल्‍या होत्‍या. या सर्व गाड्या डाऊन दिशेच्या आहेत. तर कणकवलीजवळ अप दिशेची मंगला एक्सप्रेस खोळंबली होती.

Trending