आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kottapallle Says In Maha. Marathi Sepaking Is Must

\'महाराष्ट्रात राहायचे असेल तर मराठी आलेच पाहिजे\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा- ‘आजकाल आपल्याकडे सर्रास हिंदी बोलले जाते. मात्र, मातृभाषा समृद्ध करायची असेल तर आपल्याला मराठीतच बोलले पाहिजे. तसेच दुस-या व्यक्तीलाही मराठीत बोलण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. महाराष्ट्रात राहायचे असेल तर प्रत्येकाला मराठी आलेच पाहिजे,’ असे परखड मत अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केले.

यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून साता-यात शनिवारी सायंकाळी आयोजित मराठी भाषा पंधरवडा कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. कोत्तापल्ले म्हणाले, वसंत गोवारीकरांसारख्या अनेक शास्त्रज्ञांचेही शिक्षण मराठीतूनच झाले. ‘लोकभाषा ही ज्ञानभाषा झाली पाहिजे,’ यासाठी यशवंतराव नेहमी आग्रही असत, अशी आठवणही त्यांनी करून दिली.

संमेलनात दबाव नव्हता !- साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद आले आणि वाद सुरू झाले. वाद हे व्हायलाच पाहिजेत. ते वाद विचारांचे होते. लक्ष्मण माने आणि माझा काही बांधाला बांध नाही. आपण बोललो ते समाजाच्या उन्नतीसाठी बोललो. संमेलनाच्या काळात माझ्यावर कोणाचाही अजिबात दबाव नव्हता, असे स्पष्टीकरणही डॉ. कोत्तापल्ले यांनी दिले.