आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोयनेचे दरवाजे 12 फुटांनी उघडण्‍यात आले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली - कोयना धरणाचे सहाही दरवाजे बुधवारी सकाळी साडेबारा फुटांनी उचलण्यात आले. या धरणातून 61 हजार 763 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. आठवड्यापासून कोयनेसह धोम, कण्हेर, वारणा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने धरणांची पातळी झपाट्याने वाढत आहे. सध्या धरणात 82 टक्के पाणीसाठा झाल्याने दोन-तीन दिवसांपासून विसर्ग सुरू आहे. कृष्णेच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने सांगलीत बुधवारी नदीची पाणीपातळी 29 फुटांपर्यंत पोहोचली. पुराचा धोका वाढल्याने पाच कुटूंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे.