आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोल्हापुरात 1 ते 4 डिसेंबर दरम्यान ‘सतेज कृषी आणि पशु प्रदर्शन’

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर-  शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन तंत्रज्ञान आणि माहिती मिळावी या उद्देशाने  ‘सतेज कृषी आणि पशु प्रदर्शन’ येत्या 1 ते 4 डिसेंबर दरम्यान कळंबा येथील तपोवन मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून देशविदेशातील नामवंत कंपन्यांचा सहभाग या प्रदर्शनात असणार आहे, अशी माहिती आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.


प्रदर्शनाचे उद्घाटनास1 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री पतंगराव कदम, आमदार हसन मुश्रीफ, महापौर हसीना फरास हे उपस्थितीत राहणार आहेत. शेतकरी ते ग्राहक असा थेट विक्री होणारा तांदूळ महोत्सव, 200 हुन अधिक कृषी क्षेत्राशी संबंधित कंपन्या, 300 हून अधिक जातिवंत पशु-पक्षी आणि जनावरे यांचे भव्य दालन, नांदेडहून गलबेल लाल गांधारी, लातूरहून देवणी गाय आणि जर्शी, डॅनिष गाय सारख्या अनेक गायींच्या प्रजाती हे प्रदर्शनाचे वैशिठ्य असणार आहे. याचबरोबर अश्व, शेळ्या, मेंढ्या, ससे यांच्या पालनातून व्यवसाय निर्मिती याबद्दल मार्गदर्शन आणि जनावरांचा गौरव करण्यात येणार आहे. चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात परभणी येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन मार्तंड, कृषी तज्ञ विलास शिंदे, कृषिभूषण शेतकरी संजीव माने यांची मार्गदर्शनपर व्याख्याने होणार आहेत.

 

     एकूणच या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आणि कोल्हापूरच्या जनतेला एकूणच हे प्रदर्शन माहिती आणि मार्गदर्शन मिळणार असल्याने या कृषी प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केले आहे. या प्रदर्शनासाठी स्कायस्टार इव्हेंट संस्थेने नियोजन केले आहे. 


     पत्रकार परिषदेस उपमहापौर अर्जुन माने, संदीप नेजदार, शारंगधर देशमुख, मधुकर रामाणे, धीरज पाटील, कृषी विभागाचे अतुल जाधव, रिलायन्स पॉलीमर्सचे सत्यजित भोसले, प्रफुल्ल काटे, जयवंत जगताप, सुयोग मगदूम, उदय जाधव उपस्थित होते.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...