आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मायक्रो फायनान्स’चे कार्यालय फोडून महिलांनी अधिकाऱ्याला बसवले गाढवावर; यामुळे होत्या त्रस्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कंपनीच्या अधिकाऱ्याला अशा पध्दतीने गाढवावर बसविण्यात आले होते. - Divya Marathi
कंपनीच्या अधिकाऱ्याला अशा पध्दतीने गाढवावर बसविण्यात आले होते.
कोल्हापूर/सातारा/पुणे- कऱ्हाड येथील दिशा मायक्रो फायनान्स कंपनीच्या कार्यालयाची महिलांनी तोडफोड केली. मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी एवढ्यावरच न थांबता अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासत त्यांना गाढवावर बसवले. हे खासगी सावकारी करतात, असा आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
 
काय पूर्ण प्रकरण
कऱ्हाड तालुक्यात अनेक महिला बचत गटांना  दिशा मायक्रो फायनान्स कंपनीने कर्ज वाटप केले होते. 
- नियमित हफ्ते भरल्यावरही कर्जाची रक्कम कमी होत नसल्याने महिला त्रस्त होत्या. कर्जाच्या हफ्त्यासाठी कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी महिलांना त्रास देत होते आणि पूर्ण माहितीही सांगत नव्हते. 
- महिलांनी ही माहिती मनसेला कळवली होती. त्यानंतर त्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत कंपनीच्या कार्यालयात आल्या. तेथे त्यांनी तोडफोड केली. म
- महिला खूपच चिडलेल्या होत्या. त्यांनी अधिकाऱ्याच्या तोंडास काळे फासत त्याला गाढवावरुन गावात फिरवले. 
- कंपनीचे अधिकारी वैभव कांबळे यांनी याबाबत सिटी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी मनसेच्या 8 कार्यकर्त्यांना अटक केली आहे. 
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो
बातम्या आणखी आहेत...