आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lady Police Officer Molestated, Crime Registered Against Shiv Sena MLA

महिला पोलिस अधिका-याचा विनयभंग; शिवसेना आमदारावर गुन्हा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर - विसर्जन मिरवणुकीत महिला पोलिस अधिका-यांचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांच्याविरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. क्षीरसागर यांना अटक केली जाईल, अशी माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक ज्योतिप्रियासिंग यांनी दिली.


मिरवणूक सुरू असताना बुधवारी रात्री साडेबाराच्या सुमारास कोल्हापुरातील पापाची तिकटी परिसरातील कार्यकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली होती. यात एक महिला अधिकारी जखमी झाल्या. याच वेळी आमदार क्षीरसागर यांनी केलेल्या भाषणामुळे जमाव आक्रमक झाला. ‘गणपती आमचा आहे, तो पंजाबच्या बाईचा नाही’ अशा भाषेत क्षीरसागर यांनी टोलेबाजी केल्याने कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाले. या पार्श्वभूमीवर धक्काबुक्की, दगडफेक आणि चप्पलफेक झाल्याने क्षीरसागर व 50 कार्यकर्त्यांवर विनयभंग, सरकारी कामात अडथळा आणणे असे गुन्हे दाखल केले.


‘खोटे गुन्हे दाखल केले’
मिरवणूक शांततेत सुरू असताना पोलिसांनी जाणीवपूर्वक आमच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली. माझ्याविरोधात हा राजकीय कट असून खोटे गुन्हे दाखल केल्यास शिवसेना आपल्या स्टाइलने रस्त्यावर उतरेल, असा इशारा आमदार क्षीरसागर यांनी दिला.


आम्ही मार खायचा काय?
‘ मला बदलीची भीती नाही. निवडणूकही लढवायची नाही. त्यामुळे मी कायदेशीर कारवाई करत राहणार. क्षीरसागर यांनी अटक केली जाईल. समाजाच्या रक्षणासाठी आम्हीच काम करायचे आणि कार्यकर्त्यांचा मारही खायचा का, असा सवाल करत ‘स्वसंरक्षणासाठी आम्ही कारवाई केली तर बिघडले कुठे?’ असा सवाल ज्योतिप्रियासिंग यांनी केला.