आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Lady Professor Unnaturally Give Birth Baby In Kolhapur

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोल्हापुरात भररस्त्यात प्राध्यापिकेची प्रसूती, अनैतिक संबंधातून घडलेला प्रकार?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर - अनैतिक संबंधातून गर्भवती राहिलेल्या एका प्राध्यापिकेची रस्त्यातच प्रसूती झाल्याचा प्रकार रविवारी शहरातील कसबा बावडा परिसरात घडली. दरम्यान, ही प्राध्यापिका नवजात कन्या अर्भकाला फेकण्यासाठी निघाली होती, मात्र तिची गाडी घसरल्याने हा प्रकार उघडकीस आल्याची चर्चा घटनास्थळी होती.

कसबा बावडा येथील शिये रस्त्यावर सोमवारी अँक्टिव्हा गाडी घसरल्याने त्यावरील महिला पडली. मदतीच्या उद्देशाने तिला उचलण्यासाठी काही नागरिक धावले असता एका पिशवीतून बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. अशातच या महिलेला रक्तस्राव सुरू झाल्याने नागरिकांनी ही घटना अग्निशामक दलास कळवली. या पथकाच्या गाडीतून प्राध्यापिकेला बाळासह सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अविवाहित प्राध्यापिकेने स्त्री जातीच्या बाळाला जन्म दिला होता. मात्र, हे अपत्य अनैतिक संबंधातून जन्माला आल्याने ते फेकण्यासाठीच ती निघाली होती, असा संशय प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केला आहे. ही महिला एका प्रसिद्ध शिक्षण समूहाच्या एका कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून कार्यरत असल्याचे सांगण्यात आले.