आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूस्खलनाच्या शक्यतेने पन्हाळा तालुक्यातील 5 कुटुंबातील 23 व्यक्तींचे स्थलांतर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. दुर्गम डोंगराळ भागात आणि धरणक्षेत्रात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पन्हाळा तालुक्यातील मौजे वेतवडे या गावातील डोंगरावर राहणाऱ्या एकूण 5  कुटुंबातील 23 लोकांना भूस्खलनाच्या शक्यतेने  वेतवडे गावच्या प्राथमिक शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासनाकडून पीडित कुटुंबातील लोकांना दैनंदिन गरजेच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जिल्हा आपत्कालीन अधिकारी दिनकर कांबळे यांनी सांगितले.
शिवाजी सखाराम जाधव (58) यांच्या कुटुंबातील 5 सदस्य, महादेव रामजी पाटील (61) कुटुंबातील 7 सदस्य, चंद्रकांत दत्तू सुतार (46) यांच्या कुटुंबातील 3 सदस्य, भगवान शंकर माने (41) यांच्या कुटुंबातील 4 सदस्य, ज्ञानू गणपती कांबळे (52) यांच्या कुटुंबातील 4 असे एकूण 23 लोक स्थलांतरित करण्यात आले आहेत.

मागील वर्षीही पावसाळ्यात या डोंगरावरील घरे असणाऱ्या कुटुंबाना स्थलांतरित करण्यात आले होते. दरवर्षी पावसाळ्यात मौजे वेतवडे गावातील डोंगरावरील परिस्थिती भूस्खलन सदृश्य होत असेल तर माळीण गावची पुनरावृत्ती झाल्याशिवाय कोल्हापूरच्या जिल्हा प्रशासनाला  जाग येणार नाही का ? सवाल उपस्थित केला जात आहे.
बातम्या आणखी आहेत...