आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Law Collage Students Filed Pettion Against Kolhapur Municipal Corporation Commissioner

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विधी महाविद्यालयाच्या विद्या‍र्थ्‍यांनी कोल्हापूर मनपा आयुक्तांव‍िरूध्‍द दाखल केली याचिका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर - शहरातील खड्ड्यांना जबाबदार धरून पुण्यातील मनपा आयुक्तांविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ मंगळवारी याच कारणावरून कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तांविरोधात लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. परशुराम कदम या विद्यार्थ्याने अ‍ॅड. हेमा काटकर यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे.


शहरातील अनेक मुख्य रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी आरआयबी कंपनीचे अपुरे काम, माती आणि मुरुमाने भरलेले खड्डे यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे होणारा शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रास, वेळेचा अपव्यय, वाहनांचे होणारे नुकसान या बाबींचा याचिकेत उल्लेख करण्यात आला आहे. मुंबई प्रांतिक महानगरपालिका कायद्यातील कलम 431 अन्वये ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
पुण्यातील खड्डेप्रकरणी सोमवारीच एका वकिलाने मनपा आयुक्तांच्या विरोधात फौजदारी दावा दाखल केला होता. राज्यातील ज्या शहरांतील रस्त्यांची दुरवस्था आहे त्या ठिकाणी आता ही दाव्यांची मोहीम राबवली जात आहे.