आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्ष्मण मानेंचा जामीन फेटाळला; महिला कर्मचार्‍यांचे शारीरिक अत्याचाराचे आरोप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा - आश्रमशाळेतील पाच महिला कर्मचार्‍यांनी शारीरिक अत्याचाराचे आरोप केल्याने पद्मश्री लक्ष्मण माने यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचे स्वरूप पाहता स्थानिक न्यायालयाने सोमवारी माने यांनी सादर केलेला अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळून लावला. माने यांच्यावर गुन्हा दाखल होऊन आठ दिवस उलटले तरी अद्याप त्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. पोलिसांच्या पथकाने मानेंच्या घराची तपासणी करून काही सामान ताब्यात घेतल्याचे सांगितले जाते. दरम्यान, मानेंवरील सर्व आरोप खोटे असल्याचे सांगत त्यांच्या समर्थनार्थ सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. वर्षा देशपांडे मंगळवारी सातार्‍यात मोर्चा काढणार आहेत. त्यात रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते व अन्य काही संघटनाही
सहभागी होणार आहेत.