आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लैंगिक छळ प्रकरण : 'उपरा'कार लक्ष्मण माने यांची 90 दिवसांनंतर जामीनावर मुक्तता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा - आश्रमशाळेतील सहा महिलां कर्मचा-यांचा लैंगिक छळ केल्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले 'उपरा'कार माजी आमदार लक्ष्मण माने यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. ९० दिवस पोलिस आणि न्यायालयीन कोठडीत राहिल्यानंतर आता त्यांची जामीनावर मुक्तता होत आहे.

लक्ष्मण मानेंवर आश्रमशाळेतील सहा महिला कर्मचा-यांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात न्यायालयाने तीन महिन्यानंतर त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर झालेल्या सुनावणीत त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

मानेंच्या विरोधात मार्च महिन्यात एका पाठोपाठ एक अशा सहा महिलांनी बलात्कार आणि लैंगिक छळाच्या तक्रारी दाखल केल्या होत्या. गुन्हा दाखल झाल्यानंतर माने 15 दिवस फरार होते. ज्या आश्रमशाळेतील महिलांनी मानेंवर आरोप केले होते. ती आश्रमशाळा ज्या संस्थेमार्फत चालविली जाते तिचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आहेत. पवारांनी मानेंनी पळ काढण्यापेक्षा पोलिसांना शरण या, सत्य काय आहे ते कळू द्यावे असे सुनावल्यानंतर मानेंनी पोलिसांपुढे शरणागती पत्करली. त्यावेळी त्यांनी सर्व आरोपांचे खंडन करताना, ‘माझ्यावर कमरेखाली वार करणा-यांवर अशीच वेळ आणणार असून अ‍ॅड. पल्लवी रेणके, हरी नरके, शिवाजी भोसले तसेच आश्रमशाळेचा कर्मचारी देशमुख यानेच हा कट रचल्याचा आरोप माने याने केला होता. ‘खरं तर माझ्यावरच ‘बलात्कार’ झालाय,’ अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली होती.