आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘उपरा’कार लक्ष्मण मानेला तीन दिवस पोलिस कोठडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा - शारदाबाई पवार आश्रमशाळेतील सात महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांना मंगळवारी सातारा सत्र न्यायालयाने 12 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
आश्रमशाळेत काम करणा-या सहा स्वयंपाकी महिलांनी माने यांच्याविरोधात लैंगिक छळ केल्याच्या तक्रारी केल्या होत्या. गुन्हा दाखल झाल्यानंतर सुमारे दोन आठवडे फरार असलेल्या मानेंनी सोमवारी शरणागती पत्कारली होती. दरम्यान, रात्री अकराच्या सुमारास छातीत दुखत असल्याची तक्रार त्यांनी पोलिसांकडे केली, त्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. माने यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना रात्रभर रूग्णालयातच ठेवले. मंगळवारी रक्तदाब सामान्य झाल्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.


पद्मश्री परत करा : भोसले
लक्ष्मण माने माझा मित्र आहे, परंतु सध्या जे प्रकरण सुरू आहे तो एक कट असून त्यामध्ये माझा समावेश असल्याचा आरोप त्याने केला आहे. जर हा आरोप सिद्ध झाला तर मी माझा दलितमित्र पुरस्कार परत करतो, परंतु सिद्ध न झाल्यास लक्ष्मणनेही पद्मश्री परत करावी, अशी मागणी माने यांच्याच संस्थेचे संचालक व्यंकप्पा भोसले यांनी मंगळवारी केली.


सीबीआय चौकशी करा : रेणके
माने यांच्या संस्थेशी रेणके, नरके कुटुंबीयांचा संबंध नाही. संस्थेतील सात महिलांनी त्यांच्याविरोधात तक्रार केली. त्याच वेळी ते शरण आले असते तर विश्वासार्हता समजून घेता आली असती. एका राष्ट्रीय नेत्याने आवाहन केल्यानंतर ते हजर होतात. सीआयडी चौकशीची मागणी करतात. आम्ही तर म्हणतो, सीबीआय चौकशीच झाली पाहिजे, असे ‘लोकधारा’ संस्थेच्या प्रमुख पल्लवी रेणके यांनी सांगितले.