आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Laxman Mane In Hospital At Satara After Surrender

कोर्टात हजर होण्यापूर्वीच बिघडली लक्ष्मण मानेंची प्रकृती; रुग्णालयात दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा - बलात्काराचे आरोप झालेल्यानंतर तब्बल दोन आठवड्यांनी पोलिसांना शरण आलेले माजी आमदार आणि 'उपरा'कार लक्ष्मण मानेंची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्‍यात आले आहे.

मानेंविरुद्ध बलात्काराचे सहा गुन्हे दाखल करण्‍यात आले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी द‍िलेल्या सल्ल्यानंतर माने पोलिसांना शरण आले होते. त्यांनतर त्यांना तत्काळ अटक करण्‍यात आले होते.

लक्ष्मण माने यांना मंळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार होते. मात्र, त्यापूर्वीच त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.