आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एलबीटी’ रद्द करण्यासाठी सरकारला 5 जूनची डेडलाइन, सांगलीतील बैठकीत व्यापार्‍यांचा इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - राज्य सरकारने 5 जूनपर्यंत एलबीटी रद्द करावी; अन्यथा 6 जूनपासून पुन्हा आंदोलन सुरू करण्याचा इशारा राज्यातील व्यापार्‍यांनी सोमवारी झालेल्या बैठकीत दिला. ‘दिल्ली तो शुरुवात है, मुंबई अभी बाकी है’ असा नारा देत सूचक इशाराही व्यापार्‍यांनी या वेळी दिला.
एलबीटीविरोधात राज्यातील 26 महापालिकांतील व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची सोमवारी शहरातील राजमती भवनमध्ये बैठक झाली. ‘फॅम’चे अध्यक्ष मोहन गुरनानी अध्यक्षस्थानी होते. वारंवार मागणी करूनही सरकार एलबीटी रद्द करण्याचा निर्णय घेत नसल्याचा आरोप व्यापार्‍यांनी केला. ‘लोकसभा निवडणुकीत व्यापारी काय करू शकतात, याची झलक सरकारला दाखवली आहे. आता लवकरच एलबीटी रद्द केला नाही तर विधानसभेतही त्याचा प्रत्यय येईल,’ असा गर्भित इशाराही व्यापार्‍यांनी दोन्ही काँग्रेसला दिला.

मोहन गुरनानी म्हणाले, ‘आमचा विरोध कर भरण्याला नाही. भ्रष्टाचाराला खतपाणी घालणार्‍या कर पद्धतीला आमचा विरोध आहे. शरद पवार यांनी स्वत: सरकारला 27 दिवसांपूर्वी एलबीटी रद्द करण्याचा निर्णय घ्यावा, अशी सूचना केली होती. मात्र सरकार आजही गंभीर नाही.’