आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : कोल्हापुरात ‘लेडी सिंघम’चा दरारा, रोड रोमिओंना केली पळता भुई थोडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर - दोन तरुणी पल्सरगाडीवर आल्या.. एका महाविद्यालयाच्या आवारात गाडी लावून कॉलेजकुमारांचे ओळखपत्रे तपासण्यास सुरुवात केली. ओळखपत्र नसणार्‍या व गैरवर्तन करणार्‍या काहींच्या कानाखाली आवाज काढला. त्या साध्या वेशातील पोलिस अधिकारी असल्याचे कळाल्यानंतर मात्र सर्वांची पळापळ सुरू झाली. कोल्हापुरातील अतिरिक्त पोलिस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंग (पंजाबी ड्रेस) आणि उपविभागीय जिल्हा पोलिस उपअधीक्षक वैशाली माने (जीन्स पँट, शर्ट) यांनी सडक सख्याहरींविरोधात मोहीम सुरू करत 88 जणांवर कारवाई केली. शहरातील विवेकानंद, ताराराणी विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ परिसरात ही कारवाई केली. ओळखपत्रे नसणे, गाड्यांची परवाने नसणार्‍यांवर त्यांनी दंडात्मक कारवाई केली. फॅन्सी नंबरप्लेटचे फोटोही घेतले.

पुढे लेडी सिंघमने केलेली कारवाई पाहा छायाचित्रांमधून........