आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सोलापूर - ‘टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संगे, देवाजीच्या दारी आज रंगले अभंग...’
‘ज्ञानोबा तुकाराम’, ‘जयहरी विठ्ठल’ नामाचा गजर करीत, टाळ-मृदंगाच्या गजरात आणि भगव्या पताका उंचावत संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज व श्री ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही पालख्यांचे रिंगण रविवारी अतिशय उत्साहात सोलापूर जिल्ह्यात झाले. तुकोबांच्या पालखीचा भक्तीसोहळा अकलूजमधील माने विद्यालयाच्या मैदानावर तर माउलींचे रिंगण सदाशिवनगर येथील शंकर सहकारी साखर कारखान्याच्या मैदानावर रंगले. दोन्ही पालख्यांच्या स्वागतासाठी भाविकांनी पायघड्या घातल्या होत्या. माउलींच्या पालखीने शनिवारीच जिल्ह्यात प्रवेश केला होता, तर तुकोबांच्या पालखीने रविवारी सकाळी प्रवेश केला. सोलापूर जिल्ह्यात येताच नीरा नदीच्या पाण्याने संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना स्नान घालण्यात आले. या वेळी स्थानिक भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा रविवारी माळशिरसमध्ये तर तुकोबांचा पालखी सोहळा अकलूजमध्ये मुक्कामासाठी विसावला.
चेतकची देखभाल रफिककडे
तुकोबांच्या पालखीतील चेतक अश्वाने रिंगणात सलग सहा फे-या मारल्या. हा घोडा जयसिंह मोहिते-पाटलांचा असून त्याची देखभाल करणारा रफिक तांबोळी नामक वारकरी अकलूजकर आहे. संपूर्ण पालखीत तो देखभाल घेतो.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.