आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चला जाऊ पंढरीला: माऊली सोलापूर जिल्ह्यात, तुकोबांचे आज होणार आगमन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकलूज - संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याने शनिवारी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. सातारा व सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर धमर्पुरी येथे प्रशासनाच्या वतीने तिचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. त्यानंतर वैष्णवांची ही मांदियाळी नातेपुते येथे विसावली. विठूनामाचा जयघोष, टाळ- मृदंगाच्या गजराने परिसर दुमदुमला.


सातारा जिल्ह्यातील बरड येथील मुक्काम आटोपून माउलीची पालखी सकाळी 11.30 वाजता धमर्पुरीजवळ आली. पालकमंत्री दिलीप सोपल, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम, पोलिस अधीक्षक राजेश प्रधान आदींनी यांनी सोहळ्याचे स्वागत केले. मानाच्या अश्वाची पूजा डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. साता-याचे जिल्हाधिकारी एन. रामास्वामी व पोलिस अधीक्षक के. प्रसन्ना यांनी पालखी सोहळ्याची सूत्रे सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम व पोलिस अधीक्षक डॉ. राजेश प्रधान यांच्याकडे सुपूर्द केली.


आज अकलूजला रिंगण
संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा रविवारी सकाळी 9 वाजता सोलापूर जिल्ह्यात अकलूज येथे प्रवेश करणार आहे. या पालखी सोहळ्यातील जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण सकाळी 10.30 वाजता अकलूज येथील सदाशिराव माने विद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. रविवारी ही पालखी अकलूज येथेच मुक्कामी राहणार आहे.