आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोकुळ दुधाच्या टेम्पोतून दारूची वाहतूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - शहरातील प्रसिद्ध गोकुळ दूध संघाच्या दूध वाहतूक करणाऱ्या टेम्पोतून सुमारे ८५ हजार रुपयांची चोरटी दारूची वाहतूक होत असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने जप्त केली. पथकाने टेम्पोसह लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोघांना अटक केली आहे.

गोकुळच्या दुधाची वाहतूक करणाऱ्या एमएच ०९ सीए ४६६४ या टेम्पोतून गुरुवारी चोरटी दारू आणली जात असल्याची खबर भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार गोकुळ प्रकल्पाच्या जवळच असलेल्या कणेरीवाडी येथे सापळा रचून छापा टाकण्यात आला. या वेळी टेम्पोमध्ये दारूच्या विविध २० ब्रॅन्डच्या ८३ बाटल्या आढळून आल्या. तसेच गोकुळच्या दुधाचे ३०० ट्रे या टेम्पोत होते. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच या प्रकरणी संदीप हिंदुराव पाटील (रा. म्हाळुंगे, ता. करवीर) अमित बाजीराव पाटील (रा. भेंडवडे ता. भुदरगड) या दोघांना अटक करण्यात आली आहे.