आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ समीक्षक म.द. हातकणंगलेकर यांचे सांगलीत निधन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ समीक्षक प्रा. म. द. हातकणंगलेकर यांचे रविवारी सकाळी अल्प आजाराने निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते.
गेल्या मंगळवारी अस्वस्थ वाटत असल्याने म.द. यांना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दविस त्यांची प्रकृती चिंताजनक होती; त्यानंतर सुधारणा झाली होती. रविवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी सुधा, मुलगा प्रदीप, रेवती आणि विश्रब्धा या मुली आहेत. सांगलीतील २००८ मधील साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. येथील विलिंग्डन कॉलेजात इंग्रजीचे, तर धारवाड येथे कृषी महाविद्यालयात पूर्णवेळ प्राध्यापक म्हणून त्यांनी प्रदीर्घ काळ काम केले. १९६२पासून ते पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे सदस्य होते. ज्ञानपीठ मंडळ, साहित्य संस्कृती, विश्वकोश निर्मिती अशा संस्थांवर ते सदस्य राहिले.