आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Madan Bhosale News In Marathi, Congress, Divya Marathi

मदन भोसले भाजपमध्ये दाखल होण्याची शक्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा - सातारा जिल्ह्यातील आघाडीसमारे मदन भोसले यांच्या रूपाने वाई मतदारसंघात आव्हान उभे रहाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रविवारी होणाऱ्या मेळाव्यात मदन भोसले यांच्या भाजप प्रवेशासंदर्भात घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले यांचे मदन भोसले हे चिरंजीव आहेत. काँग्रेसच्या चिन्हावर त्यांनी निवडणुका लढवल्या होत्या. मात्र, काँग्रेसमध्ये सर्वच काही आलबेल असल्याने ते भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. प्रतापराव भोसले यांनी सुमारे सहा वर्षांपूर्वी काँग्रेस धोरणांच्या विरोधात भूमिका घेतली होती. मध्यंतरी डॉ.येळगावकर यांनी ही मदन भोसले भाजपच्या वाटेवर असल्याचे सुतोवाच केले होते. तेव्हा आमदार आनंदराव पाटील यांनी त्याचा इन्कार केला होता. मात्र, रविवारी वाई येथे होणाऱ्या मेळाव्यात त्यांच्या भाजपमध्ये प्रवेशाचा निर्णय होणार असल्याचे सूत्रांनी सांिगतले.

पाटण येथे राष्टवादीच्या काही प्रमुख कार्यकर्त्यानी शिवसेनेत प्रवेश केला आहे . डॉ.येळगावकर भाजपच्या वाटेवर आहेत तर आता मदन भोसले यांच्या भाजप प्रवेशाने जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघणार आहे.