आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आमचा पक्ष वाढवायला आम्ही मोकळे : प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - गेली अनेक वर्षे असलेली युती तोडून आम्ही स्वतंत्रपणे विधानसभेला लढलो, पण महाराष्ट्राचा कारभार आम्ही मिळून करत आहोत. असे असले तरी आम्ही आमचा पक्ष वाढवायला मोकळे आहोत आणि त्यांनाही तो अधिकार आहे, असे सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी राज्यात पक्षवाढीसाठी यापुढे जोरदार मोहीम राबवण्याचे पत्रकार परिषदेत संकेत दिले. राज्य भाजप कार्यकारिणीच्या बैठकीच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते.

दानवे म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्या सरकारने गेल्या वर्षभरामध्ये जे निर्णय घेतले ते जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्राचे नेते राज्यात आणि राज्याचे नेते जिल्ह्यात जाणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. तसेच नव्याने ज्या सभासदांची नोंदणी झाली आहे त्यांच्याशीही राज्यातील २ लाख कार्यकर्ते संपर्क साधणार असल्याचे रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

रस्त्यांच्या मूल्यांकनानंतर टोलचा निर्णय : फडणवीस
कोल्हापुरात आयआरबी कंपनीने केलेल्या रस्त्यांना नेमका किती खर्च आला याचे मूल्यांकन सुरू आहे. ते झाल्यानंतरच टोलबाबतचा नेमका निर्णय घेता येईल. मात्र, ही रक्कम भागवण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेला काही ना काही उपाय योजावे लागतील, अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाची भूमिका स्षष्ट केली आहे.

एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील टोलविरोधी कृती समितीने फडणवीस यांची भेट घेऊन टोलमुक्तीची मागणी केली. या वेळी ते बोलत होते. या वेळी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार राजू शेट्टी, खासदार धनंजय महाडिक यांची उपस्थिती होती.

...तर वाय दर्जाची सुरक्षा
मी शासनाकडे सुरक्षा मागितली नव्हती किंवा आमच्या सरकारने आपणहून दिली असे नव्हे. मात्र, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने मला वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था देण्याचा निर्णय घेतला असल्याचे या वेळी दानवे यांनी एका उत्तर देताना सांगितले.

सेनेशी चर्चा सुरू असते
शिवसेना आणि आम्ही एकत्र असलो, तरी जैतापूर प्रकल्प, शेतकर्‍यांच्या आत्महत्या याबाबत आमची मते वेगळी आहेत. त्यांच्याशी आमच्या नेहमी चर्चा सुरू असतात. मुख्यमंत्री फडणवीस, नितीन गडकरी, आपण स्वत: उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचे दानवे म्हणाले.

पुढे वाचा, कडाडणारी हलगी, कोल्हापुरी फेटे अन् अंबाबाईचे सूक्त....