आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारच जात काढतात, आम्ही जातीयवादी नाही- महादेव जानकर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- मी आणि राजू शेट्टी जातीयवादी नाहीत. मात्र, ज्येष्ठ नेते म्हणवून घेणारे शरद पवार यांना जात काढायची सवय आहे. म्हणूनच त्यांनी राजू शेट्टींचीही जात काढली होती. जोपर्यंत यापुढे शेट्टी आणि जानकर आहेत तोपर्यंत अजित पवारांना सत्ता मिळणार नाही, अशा शब्दांत राज्याचे नूतन पशू व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी पवार-काका पुतण्यांना टोले लगावले.

जानकर आणि नूतन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या संयुक्त सत्काराचे आयोजन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथे करण्यात आले होते. या वेळी भरपावसात कार्यकर्त्यांनी या दोघांसह राजू शेट्टी यांची जंगी विजयी मिरवणूक काढली.
यापुढच्या काळात स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्ष वाढवण्याची कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. कार्यकर्त्यांनी ताकद दिली तर दोन्ही संघटनांना आणखी लाल दिव्याच्या गाड्या मिळतील. शेट्टी यांच्या स्वाभिमानी दूध संघाचा आदर्श घेऊन आणि ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ असा कारभार करू, असा विश्वास या वेळी जानकर यांनी व्यक्त केला.
सदाभाऊंवेळी शिट्ट्यांचा पाऊस : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मुलुखमैदान तोफ अशी ज्यांची ओळख आहे त्या सदाभाऊ खोत यांच्या भाषणावेळी कार्यकर्त्यांनी टाळ्या आणि शिट्ट्यांचा अक्षरश: पाऊस पाडला. या वेळी प्रा. जालंदर पाटील, सावकर मादनाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, जानकर म्‍हणाले- आम्ही दोघे हिस्ट्रीमेकर..
बातम्या आणखी आहेत...