आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महालक्ष्मी मूर्तीचे संवर्धन, दर्शन २३ जुलैपासून बंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीच्या मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात येणार असल्याने २३ जुलै ते ६ आगस्टपर्यंत गाभाऱ्यातील दर्शन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे प्रभारी अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी ही माहिती दिली.

ही प्रक्रिया आणि त्या अनुषंगाने करावयाचे धार्मिक कार्यक्रम याबाबत समन्वय राखण्यासाठी देवस्थान समिती व श्री पूजक हक्कदार यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत ठरल्याप्रमाणे २२ जुलैपासून याबाबतची कार्यवाही सुरू होणार असून तेव्हापासूनच मुख्य मूर्तीचे दर्शन बंद ठेवण्यात येईल. भाविकांच्या दर्शनासाठी चांदीच्या उंबऱ्याबाहेर उत्सवमूर्ती व कलश दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर भाविकांनी पितळी उंबऱ्याबाहेरूनच दर्शन घ्यावे लागणार आहे.

केंद्र शासनाच्या पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनानुसार ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. याचा सर्व खर्च देवस्थान समितीने करावयाचा व धार्मिक कार्यक्रम श्रीपूजकांनी करायचे असा आदेश न्यायालयाने दिल्याने त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही प्रक्रिया दोन दिवस आधी होवून स्वच्छतेसाठी दोन दिवसांचा कालावधी मिळेल. त्यानंतर ६ आॅगस्टच्या दुपारनंतर पुन्हा मूर्ती दर्शनासाठी खुली करण्यात येणार आहे. यानिमित्ताने जे धार्मिक विधी होणार आहे ते मंदिर परिसरातील गारेच्या गणपतीसमोरील जागेत करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
बैठकीला देवस्थानच्या संगीता खाडे, प्रमोद पाटील, श्रीपूजक अजित ठाणेकर, माधव मुनिश्वर, गजानन मुनिश्वर, दादा परब, सचिव शुभांगी साठे, व्यवस्थापक धनाजी जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...