आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महालक्ष्मी मूर्तीवरील रासायनिक प्रक्रियेबाबत संभ्रम अद्याप कायम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काेल्हापूर- श्रीमहालक्ष्मीच्या मूर्तीवर होणाऱ्या रासायनिक संवर्धन प्रक्रियेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. एकीकडे यासाठीचे धार्मिक विधी सुरू असताना दुसरीकडे शासकीय पातळीवर कोणतेही थेट स्पष्टीकरण दिले न गेल्याने हा संभ्रम वाढला आहे.
२० वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर ३१ आॅगस्टपर्यंत रासायनिक संवधर्न प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश न्यायालयाने दिले हाेते. मात्र, हिंदू जनजागृती समितीने ही प्रक्रिया अधार्मिक असल्याचा अाक्षेप घेत मूर्ती बदलावी, अशी मागणी पुरातत्व खात्याच्या दिल्ली येथील मुख्य कार्यालयाला तसेच पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे केला होता. यानंतर बुधवारी सायंकाळी औरंगाबादहून या प्रक्रियेसाठी अधिकारी येणार नसल्याचे तोंडी कळवण्यात आले. गुरूवारीही याबाबत संभ्रम कायम असला तरी खासदार धनंजय महाडिक यांनी दिल्ली येथे पुरातत्त्व विभागाच्या महासंचालकांची भेट घेऊन त्यांना वस्तुस्थिती सांगितली. यानंतर शुक्रवारपासून ही प्रक्रिया सुरू होईल असे पत्रक महाडिक यांच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आले आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अमित सैनी यांच्याकडून मात्र अधिकृत काही माहिती उपलब्ध झाली नाही.
धार्मिक विधी सुरूच राहणार : रासायनिक प्रक्रिया होणार असल्याने त्यासाठीचे धार्मिक विधी सुरू झाले आहेत. मूळ मूर्तीतील प्राणतत्व काढून उत्सवमूर्तीचे दर्शन सुरू झाले आहेत. त्या वेळापत्रकात बदल होणार नाही. मात्र यातून काहीतरी तोडगा निघेल, असा अाशावाद श्रीपूजक अजित ठाणेकर यांनी व्यक्त केला.