आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महालक्ष्मीच्या दागिने मोजणीस पुन्हा सुरुवात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर - महालक्ष्मी मंदिरातील दागिन्यांचे मूल्यांकन मंगळवारपासून पुन्हा सुरू करण्यात आले. दुस-या टप्प्यात पहिल्या दिवशी पावणेएकवीस लाखांच्या 135 दागिन्यांचे मूल्यांकन करण्यात आले.

तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख हे पश्चिम महाराष्‍ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी महालक्ष्मीच्या दागिन्यांच्या मूल्यांकनाचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मुंबई येथील व्हॅल्युएटर पुरुषोत्तम काळे यांनी ही जबाबदारी स्वीकारली होती. त्यानुसार 8 जूनला मूल्यांकन सुरू झाले, परंतु 12 जूनला हे मूल्यांकन बंद झाले. आता पुन्हा हे मूल्यांकन सुरू झाले असून आज प्रामुख्याने भाविकांनी अर्पण केलेल्या नवसाच्या दागिन्यांचे मूल्यांकन करण्यात आले.

तीन पिशव्यांमधील या दागिन्यांमध्ये मंगळसूत्र, बांगड्या आदी दागिन्यांचा समावेश आहे. दुपारी दीड वाजता सुरू झालेले मुल्यांकन पाच वाजता थांबवण्यात आले.