आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महालक्ष्मीसाठी सुवर्ण पालखी, चाळीस किलाे साेन्याची गरज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- करवीरनिवासिनी महालक्ष्मीसाठी सुवर्ण पालखी तयार करण्याच्या कामाला सुवर्णपालखी समितीचे संस्थापक खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
महालक्ष्मीच्या सध्याच्या मूर्ती प्रतिष्ठापनेला ३०० वर्षे पूर्ण हाेत अाहेत. यानिमित्ताने देवीसाठी सुवर्ण पालखी तयार करण्याचा संकल्प खासदार महाडिक यांनी जाहीर केला होता. तीन महिन्यांपूर्वी शंकराचार्य व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सोने संकलनाचाही शुभारंभ करण्यात आला होता. या पालखीसाठी ४० किलो सोने लागणार असून त्यापैकी १० किलो सोने संकलित करण्यात आले आहे. या त्रिशताब्दी सोहळ्यानिमित्त लोकसहभागातून सुवर्ण पालखीस सोन्याचे मोर्चेल, चवऱ्या, सुवर्ण कलशांकित सूर्य-चंद्र, अब्दागिऱ्याही बनवण्यात येणार आहेत. यासाठी खास ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. तसेच महालक्ष्मी मंदिराजवळही सुवर्ण संकलनासाठी खास कक्ष उभारण्यात आला आहे. त्याचेही उद््घाटन महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले.