Home | Maharashtra | Western Maharashtra | Kolhapur | Mahamrutunjay Mantra for better heath of Maharashtra Farmoer Home Minister R R Patil

आर.अार. पाटलांच्या प्रकृतीसाठी देवाला साकडं, आबांच्या गावात महामृत्युंजय मंत्राचा जप

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Jan 23, 2015, 12:36 PM IST

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर.आर पाटील यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी अंजनी गावात महामृत्युंजय मंत्राचा जप सुरु करण्यात आला. अंजनी गावाचे ग्रामस्थ आणि ब्राह्मण वृंद महामृत्युंजयाचे अनुष्ठान करत आहेत. तसेच अंखडपणे राम नाम जप सुरु आहे. यज्ञ सोहळ्याला कोल्हापूरचे श्रीमद जगत गुरु शंकराचार्य आणि श्रीमद श्रीमंत सुंदरगिरी महाराज यांनी उपस�

  • Mahamrutunjay Mantra for better heath of Maharashtra Farmoer Home Minister R R Patil
    सांगली/मुंबई- राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर.आर पाटील यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी अंजनी गावात महामृत्युंजय मंत्राचा जप सुरु करण्यात आला. अंजनी गावाचे ग्रामस्थ आणि ब्राह्मण वृंद महामृत्युंजयाचे अनुष्ठान करत आहेत. तसेच अंखडपणे राम नाम जप सुरु आहे. यज्ञ सोहळ्याला कोल्हापूरचे श्रीमद जगत गुरु शंकराचार्य आणि श्रीमद श्रीमंत सुंदरगिरी महाराज यांनी उपस्थिती दिल्याची माहिती मिळाली आहे.
    दरम्यान, मुंबईतील लीलावती रुग्णालयात आर.आर. आबांवर उपचार सुरु आहेत. त्यांच्या गालावर शस्त्रक्रीया करण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

    गेल्या महिन्यांत अाबांना हृदयविकाराचा धक्का बसला. नंतर त्यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली. त्यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात हलवण्यात आले होते. यापूर्वी नोव्हेंबर 2014 मध्ये आबांवर ब्रीच कँडी रुग्णालयातही एक शस्त्रक्रिया झाल्याची माहिती मिळाली आहे.

Trending