आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापूजेचा कालावधी पाच तासांवरून दीड तासावर:

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - प्रतिनिधी यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिल्याची माहिती जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी दिली. या निर्णयामुळे ८० हजारपेक्षा अधिक भाविकांना कमी वेळेत पददर्शन व मुखदर्शन घेता येईल.
पाच तासांच्या कालावधीत तिन्ही पूजा वेगवेगळ्या पद्धतीने केल्या जात. यामध्ये विधी व मंत्र एकच असून पूजा करणारे फक्त वेगवेगळे होते. प्रथम खासगीवाले यांच्याकडून पाद्यपूजा, मंदिर समितीकडून नित्यपूजा, तर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेवटची महापूजा केली जाई. मात्र, यंदा खासगीवाले यांची पाद्यपूजा बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी मुंढे यांनी घेतला. नित्यपूजा व महापूजा या दोन्ही पूजा एकत्रित करण्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे.
मुख्यमंत्र्यांना नेसावे लागणार सोवळे
मंदिर समितीच्या निर्णयानुसार नित्यपूजा व महापूजा यंदा प्रथमच एकत्र होणार आहे. नियमानुसार नित्यपूजा करताना सोवळे परिधान करणे आवश्यक असणार आहे. यामुळे यंदा मुख्यमंत्री फडणवीस यांना सोवळे नेसून नित्यपूजा व महापूजा करावी लागणार आहे. सोवळे नेसून पूजा करणारे फडणवीस पहिलेच मुख्यमंत्री ठरणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...