आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोल्हापूर - दहाव्या मिनिटाला कुस्तीचा निकाल लावण्यात प्रसिद्ध असणारे डबल महाराष्ट्र केसरी लक्ष्मण वडार (48) यांचे हृदयविकाराने शनिवारी केर्ले (ता. करवीर) येथे राहत्या घरी निधन झाले. टांग आणि डाक डावावर प्रभुत्व असलेल्या या मल्लाच्या निधनाने कुस्ती विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन बहिणी असा परिवार आहे.
वडार समाजात जन्म झालेल्या लक्ष्मण यांच्या घरची परिस्थिती बेताची होती. लहानपणापासून ते खाणीवर दगड फोडण्याच्या कामाला जात असत. कुस्तीची आवड असल्याने दिवसभर खाणीत काम करून रात्री ते कुस्तीचा सराव करत. कुस्तीच्या ओढीने ते कोल्हापूरच्या काळाइमाम तालमीत सरावासाठी येत. केर्ले ते कोल्हापूर असे दहा किलोमीटरचे अंतर ते रोज पळत असत. वस्ताद दत्तू माळी, बाळासाहेब गायकवाड यांनी त्यांना मार्गदर्शन केले. काही वर्षे त्यांनी महानगरपालिकेत कुस्तीचे प्रशिक्षक म्हणून नोकरीही केली.
महाराष्ट्र केसरीची गदा दोन वेळा पटकावली
1972 मध्ये कोल्हापुरात महाराष्ट्र केसरीसाठी स्पर्धा झाली. या वेळी लक्ष्मण वडार यांनी मोहनसिंग बिसेना यांचा पराभव करून पहिल्यांदा महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली. यानंतर लगेच पुढच्याच वर्षी अकोला येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अहमदनगरच्या रघुनाथ पोवार यांचा पराभव करून सलग दुसर्या वर्षी महाराष्ट्र केसरीची गदा कोल्हापुरात आणली. त्यामुळे त्यांचा उल्लेख नेहमी ‘डबल महाराष्ट्र केसरी’ असा केला जात असे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.