आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Maharashtra Navnirman Parishad Establish In Kolhapur

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सामान्यांच्या हितासाठी महाराष्ट्र नवनिर्माण परिषद; केंद्राच्या धर्तीवर राज्यात संशोधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- सर्वसामान्यांसाठी उपयुक्त ठरणार्‍या संशोधनाला आणि संशोधकांना वाव मिळावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण परिषद स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ज्येष्ठ शास्त्रज्ञ व नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात लवकरच या विषयावर बैठक होणार आहे. डॉ. सॅम पित्रोदा अध्यक्ष असलेल्या पंतप्रधान राष्ट्रीय नवनिर्माण परिषदेच्या धर्तीवर महाराष्ट्रात ही परिषद काम करेल.

सन 2000 मध्ये केंद्र शासनाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने अहमदाबाद येथे नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन स्थापन केले आहे. सर्वसामान्यांसाठी उपयुक्त ठरेल अशा शिकलेल्या किंवा न शिकलेल्याही नागरिकांच्या नव्या कल्पनांचा अभ्यास करणे आणि त्यातील उपयुक्त संशोधन विकसित करण्यासाठी मार्गदर्शन करणे असे या फाउंडेशनचे काम आहे. डॉ. माशेलकर सध्या या फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत. उपयुक्त संशोधन करणार्‍यांना पंतप्रधानांच्या हस्ते गौरवण्यात येते. यामध्ये अनेक अशिक्षितांनीही बाजी मारली.

पंतप्रधान राष्ट्रीय नवनिर्माण परिषदेमार्फतही याच स्वरूपाचे काम करण्यात येते. सर्वसामान्यांच्या आयुष्यात सुलभता आणण्यासाठी जे संशोधन उपयुक्त ठरेल त्याला प्रोत्साहन देण्याचे काम ही परिषद करते. याच धर्तीवर राज्यात ही अशी संस्था सुरू करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. याच महिन्यात मुख्यमंत्री आणि डॉ. माशेलकर या प्रक्रियेशी संबंधित सर्वांची बैठक होणार आहे. मुख्यमंत्री हे विज्ञान आणि तंत्रज्ञानातील गती असलेले व्यक्तिमत्त्व असल्याने त्यांनी गांभीर्याने याबाबत पावले उचलली आहेत.

डॉ. माशेलकरांकडून दरवर्षी एक लाखाचे पारितोषिक
सर्वसामान्यांच्या सोयीसाठी जागतिक पातळीवरील जे संशोधन अधिक उपयुक्त ठरेल अशा संशोधकाला डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी त्यांच्या मातोश्री अंजली यांच्या नावे 1 लाख रुपयांचे जागतिक पारितोषिक ठेवले आहे. डॉ. माशेलकर यांचे ‘रिइन्व्हेटिंग इंडिया’ हे पुस्तक पुण्याच्या सह्याद्री प्रकाशनने प्रकाशित केले आहे. या पुस्तकाच्या उत्पन्नातून डॉ. माशेलकर दरवर्षी हे पारितोषिक देतात.