आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra State Board News In Marathi, Karnataka, Belgaon

येळ्ळूर येथे चोवीस तासांत पुन्हा उभारला महाराष्ट्राचा स्तंभ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- बेळगावजवळील येळ्ळूर येथील कर्नाटकच्या अधिकार्‍यांनी उखडून टाकलेला ‘महाराष्ट्र राज्य’ या नावाचा स्तंभ जिगरबाज गावकर्‍यांनी 24 तासांच्या आत पुन्हा उभारला. शनिवारी सकाळी पुन्हा पक्क्या बांधकामात फलक उभारून त्याला हार घालून इथे पुन्हा भगवा ध्वज फडकवण्यात आला. या वेळी जोरदार घोषणाही देण्यात आल्य

येळ्ळूरच्या वेशीवर गेली अनेक वर्षे ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ असा पक्क्या बांधकामातील फलक होता. हा काढण्यासाठी गेली काही वर्षे कर्नाटक प्रशासनाकडून जोरदार प्रयत्न सुरू होते. अखेर न्यायालयाच्या संभ्रमावस्थेत टाकणार्‍या आदेशाचा आधार घेत शुक्रवारी सकाळी कर्नाटक अधिकार्‍यांच्या उपस्थितीत शेकडो पोलिस तैनात करून हा स्तंभ उखडून टाकला होता.

शुक्रवारीच याचे पडसाद बेळगावसह कोल्हापुरात उमटले होते. ग्रामस्थांनी पुन्हा हा स्तंभ उभारण्याचा निर्णय घेतला व तो एका रात्रीत अमलातही आणला. सकाळी या फलकाचे बांधकाम पूर्ण करून रंग देऊन त्यावर पुन्हा ‘महाराष्ट्र राज्य’ लिहून भगवा ध्वज फडकवण्यात आला.